बंद

    “लाभार्थी योजना” पोर्टल

    जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत विविध विभागाद्वारे जि.प.सेस निधीतून विविध योजना राबविण्यात येतात याकरिता नागरिकांना अर्ज करावा लागतो.आजपर्यंत अर्ज ऑफलाइन पद्धतीने करण्यात येत होते त्यामुळे लाभार्थ्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत होता परंतु आज यवतमाळ जिल्हा परिषद द्वारे योजना लाभार्थी पोर्टल सुरू करून ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.जेणेकरून लाभार्थ्यांना आपला अर्ज घेऊन पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद मध्ये जावे लागणार नाही. लाभार्थी आपल्या मोबाईलद्वारे घरबसल्या कोणत्याही योजनेचा अर्ज भरू शकतात त्याचबरोबर लाभार्थ्यांना अर्ज केल्यानंतर त्यांना आपल्या अर्जासंदर्भात वेळोवेळी एसएमएसद्वारे सूचना सुद्धा मिळणार आहे.त्यामुळे लाभार्थी निवड प्रक्रिया जलद आणि पारदर्शी होण्यास मदत होणार आहे.एकंदरीत लाभार्थी योजना पोर्टल जिल्हा परिषदेवर मात्र विकसित करण्यात आले असून जिल्हा परिषद सेस फंडातून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची अर्ज प्रक्रिया पडताळणी पात्रता,त्रुटीची पूर्तता,मंजुरी आणि अंतिम लाभार्थी निवड हे सर्व टप्पे पूर्णतः पारदर्शक डिजिटलाईज व स्वयंचलित पद्धतीने पार पाडण्यात येणार आहे.
    या योजनेसाठी लाभार्थ्यांनी खालील लिंक वर क्लिक करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

    भेट : https://yavatmalyojana.com/

    केंद्र : जिल्हा परिषद यवतमाळ