विभागाविषयी
यवतमाळ जिल्हा उत्तर अक्षांस 19.26 ते 20.42 अंश व पुर्व रेखांश 77.18 ते 79.18 अंशावर असुन जिल्हयांचे क्षेत्रफळ 13,584 चौ.कि.मी. आहे. जिल्हयांचे एकूण क्षेत्रफळाचे तुलनेत जिल्हयामध्ये एकूण 16 तालुके/16 पंचायत समिती आहेत. जिल्हयामध्ये 2,108 एकूण गावे असून त्यापैकी वस्ती असलेली 1,836 गावे व वस्ती नसलेली 272 गावे आहेत. जिल्हयांची एकुण लोकसंख्या 20.70 लक्ष असून त्यापैकी ग्रामीण लोकसंख्या 17.20 लक्ष व नागरी लोकसंख्या 3.57 लक्ष आहे. जिल्हयामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या 2.27 लक्ष व अनुसूचित जमातीची लोकसंख्या 4.46 लक्ष आहे.
- पशुचिकीत्सालय श्रेणी-1 :- 46
- पशुचिकीत्सालय श्रेणी-2 :- 95
- आधारभूत ग्राम उपकेंद्रे :- 40
- फिरते पशुवैद्यकीय दवाखाने :- 11
- फिरते पशुरोग नियंत्रण पथक :- 01
- कुक्कुट प्रकल्प :-01