बंद

    राज्यस्तरावर यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार योजना जिल्हा परिषद, यवतमाळ

    ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे अहे. राज्यामधील विकासाच्या प्रमुख योजना पंचायत राज संस्थांमार्फत राबविल्या जातात. पंचायत राज संस्थांना त्यांनी केलेल्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता अधिक वाढविणे व त्यांच्यामध्ये उत्कृष्ट कामांची स्पर्धा निर्माण करणे अवश्यक अहे. यासाठी राज्यात पंचायत राज संस्थांचे व्यवस्थापन व विकास कार्यात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या साठी सन 2005-2006 या आर्थीक वर्षापासून विभागस्तर व राज्यस्तरावर यशवंत पंचायत राज अभियान ही पुरस्कार योजना सुरु करण्यात अलेली अहे.

    पुरस्कार
    अ.क्र. वर्ष पुरस्काराचे श्रेणी पुरस्काराची रक्कम
    1 सन 2018-19(मुल्यमापन वर्ष 2017-18) तृतीय पारितोषिक 15,00000/-
    2 सन 2020-21 (मुल्यमापन वर्ष 2019-20) द्वितीय पारितोषिक 20,00000/-
    3 सन 2022-23(मुल्यमापन वर्ष 2021-22) प्रथम पारितोषिक 30,00000/-

    पुरस्कार तपशील

    नाव: यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार

    वर्ष: 2025

    प्रदान केले: 22/02/2025