बंद

    महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.

    महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्‍ट्र जिल्‍हा परिषद, यवतमाळ

    मान्सून ची अनियमितता आणि वारंवार पडणारा दुष्काळ हा राज्यातील सरकारसाठी गंभीर चिंतेचा विषय बनला होता. दुष्काळाच्या स्थितीमुळे राज्याच्या ग्रामीण भागात अन्न, रोजगार आणि पाण्याची टंचाई निर्माण होती. त्यामुळे दुष्काळाचा ग्रामीण जनतेवर होणारा धोका आणि दुष्परिणाम कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अकुशल मजुरांना काम देऊन कायमस्वरूपी आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्‍याच्‍या जाणीवेतुन राज्यातील भीषण दुष्काळाच्या काळात ग्रामीण भागातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व जंगल, माती आणि पाणी चे व्‍यवस्‍थापन करण्‍याकरीता राज्याच्या विधानसभेने महाराष्ट्र रोजगार हमी कायदा, 1977 पारित करुन तो संपूर्ण राज्यात लागू केला.सन 2005 च्‍या दरम्यान, भारताच्या संसदेने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (सध्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणून ओळखला जातो) पारित करुन तो संपूर्ण भारतासाठी लागू केला.ग्रामीण भागातील मजुरांचे स्‍थलांतरण थांबवून ग्रामीण भागातील जणतेचे उत्‍पन्‍नाचे स्‍ञोत बळकटीकरण करणे हे नरेगाच्‍या माध्‍यमातुन साध्‍य होत आहे. त्‍या करिता अकुशल मजुराला काम देवून त्‍यातुन स्‍थावर मत्‍ता निर्माण करण्‍यात येत आहे.
    योजनेचे संकेतस्‍थळ : –
    महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना चे राष्ट्रीय संकेतस्थळ.
    महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राज्याचे संकेतस्थळ.

    महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभागातील कार्यालयाच्‍या रचनेचा तपशील.

    विभागा अंतर्गत खालील प्रमाणे अधिकारी/कर्मचारी यांची रचना केलेली आहे.

    जिल्‍हा परिषद स्‍तर.

    1. मा.मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा सहजिल्‍हा कार्यक्रम समन्‍वयक
    2. उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी (नरेगा) जिल्‍हा परिषद,यवतमाळ
    3. गटविकास अधिकारी (नरेगा) जिल्‍हा परिषद, यवतमाळ
    4. कृषी अधिकारी (नरेगा) जिल्‍हा परिषद, यवतमाळ
    5. सहाय्यक लेखा अधिकारी (नरेगा) जिल्‍हा परिषद, यवतमाळ
    6. वरिष्‍ठ सहाय्यक (नरेगा) जिल्‍हा परिषद, यवतमाळ
    7. कनिष्‍ठ सहाय्यक (नरेगा) जिल्‍हा परिषद, यवतमाळ
    8. कार्यक्रम व्‍यवस्‍थापक (नरेगा) जिल्‍हा परिषद, यवतमाळ
    9. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (नरेगा) जिल्‍हा परिषद, यवतमाळ
    10. तांञिक सहाय्यक (नरेगा) जिल्‍हा परिषद, यवतमाळ
    11. क्‍लर्क कम डेटा एन्‍ट्री ऑपरेटर (नरेगा) जिल्‍हा परिषद, यवतमाळ

    पंचायत समिती स्‍तर.

    1. गटविकास अधिकारी तथा सहगट कार्यक्रम अधिकारी पंचायत समिती
    2. सहाय्यक लेखा अधिकारी पंचायत समिती
    3. संबधित विभागाचे तांञिक अधिकारी पंचायत समिती
    4. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (नरेगा) पंचायत समिती
    5. तांञिक सहाय्यक (नरेगा) पंचायत समिती
    6. क्‍लर्क कम डेटा एन्‍ट्री ऑपरेटर (नरेगा) पंचायत समिती

    ग्रामपंचायत स्‍तर.

    1. ग्रामपंचायत अधिकारी (सचिव)
    2. ग्रामरोजगार सहाय्यक

    मग्रारोहयो योजनेच्‍या माध्‍यमातुन घेण्‍यात येणारी कामे व आवश्‍यक कागदपञे–

    महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्‍ट्र अंतर्गत २६६ प्रकारची कामे अनुज्ञेय असुन जिल्‍ह्यात सर्वसाधारणपणे मागणी असलेली कामे व त्‍या करिता आवश्‍यक दस्‍ताऐवज खालील प्रमाणे.

    वैयक्तिक सिंचन विहीर

    1. लाभार्थीचा जन्‍माचा दाखला
    2. तह‍सीलदाराचे कुटूंब प्रमुखाचा उत्‍पन्‍नाचा दाखला
    3. लाभार्थी धार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील.)
    4. पालकाचे आधार कार्ड
    5. बॅंकेच्‍या पासबुकच्‍या पहिल्‍या पानाची छायांकीत प्रत
    6. रेशन कार्ड (पिवळया अथवा केशरी रेशन कार्ड छायांकीत प्रत
    7. मतदान ओळखपत्र (शेवटच्‍या लाभाकरिता १८ वर्षे पूर्ण झाल्‍यानंतर)
    8. संबंधित टप्‍प्‍यावरील लाभाकरीता शिक्षण घेत असल्‍याबाबत संबंधीत शाळेचा दाखला (बोनाफाईड)
    9. कुटूंब नियोजन शस्‍त्रक्रिया प्रमाणपत्र

    गुरांचा गोठा(गुरांचा/शेळी/कुक्कुट पालन)

    1. ग्राम सभा ठराव
    2. करारनामा
    3. शेती असेल तर 7/12 भुमिहीन असेल तर 8 अ
    4. पशु संवर्धन विभाग जनावार असल्याचा दाखला

    नॅडेप

    1. ग्राम सभा ठराव
    2. 7/12 (सात बारा)

    वर्मी कंपोस्ट

    1. ग्राम सभा ठराव
    2. 7/12 (सात बारा)
    3. 8 अ

    मोहगणी

    1. ग्राम सभा ठराव
    2. 7/12 (सात बारा)
    3. 8 अ
    4. सिंचनाची सोय
    5. करारनामा

    वैयक्तिक वृक्ष लागवड

    1. ग्राम सभा ठराव
    2. 7/12 (सात बारा)
    3. 8 अ
    4. करारनामा

    वैयक्तिक शोषखडडा

    1. ग्राम सभा ठराव
    2. 8 अ

    वैयक्तिक शौचालय

    1. ग्राम सभा ठराव
    2. घराचा 8 अ

    वैयक्तिक शेततळे

    1. ग्राम सभा ठराव
    2. 7/12 (सात बारा)
    3. 8 अ
    4. करारनामा
    5. विहीर पुर्नेभरण

      1. ग्राम सभा ठराव
      2. 7/12 (सात बारा)
      3. करारनामा

      ओझोला खड्डा

      1. ग्राम सभा ठराव
      2. 7/12 (सात बारा)
      3. करारनामा

      ठाळीचे बांध

      1. ग्राम सभा ठराव
      2. 7/12 (सात बारा)
      3. 8 अ

      बांधावर वृक्ष लागवड

      1. ग्राम सभा ठराव
      2. 7/12 (सात बारा)

      तुती लागवड

      1. ग्राम सभा ठराव
      2. 7/12 (सात बारा)
      3. 8 अ
      4. करारनामा

      फळबाग लागवड

      1. ग्राम सभा ठराव
      2. 7/12 (सात बारा)
      3. 8 अ
      4. करारनामा

      वरील सर्व कामांच्‍या मान्‍यतेच्‍या अनुषंगाने लाभार्थ्‍यांने ग्रामपंचायतीकडे अर्ज करुन आवश्‍यक असलेला लाभ प्राप्‍त करुन घेता येईल.

    महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्‍या परिशिष्‍ट 1 कलम 1 (4) मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान्‍यक्रमाने लाभ देण्‍यात येतो.

    1. अनुसूचित जाती
    2. अनुसूचित जमाती
    3. भटक्‍या जमाती
    4. निरधिसूचित जमाती (विमुक्‍त जाती)
    5. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
    6. स्‍ञी-कर्ता असलेली कुटूंबे
    7. शारीरिकदृष्‍टया विकलांग व्‍यक्‍ती कर्ता असलेली कुटूंबे
    8. जमीन सुधारणांचे लाभार्थी
    9. इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी
    10. अनुसूचित जमाती व अन्‍य परंपरागत वन निवासी (वन हक्‍क मान्‍य करणे) अधिनियम 2006 (2007 चा 2) खालील लाभार्थी
    11. सिमांत शेतकरी (2.5 एकर पर्यंत भूधारणा)
    12. अल्‍प भुधारक (5 एकर पर्यंत भूधारणा)