वित्त विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ
वित्त विभाग हा जिल्हा परिषदेचा एक अत्यंत महत्वाचा विभाग आहे. जिल्हा परिषदेचा वार्षिक अर्थ संकल्प
तयार करणे व तो अर्थ समितीच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेमध्ये सादर करणे. जिल्हा
परिषदेच्या आर्थिक बाबीवर सुक्ष्म लक्ष ठेवणे, अर्थोपाय स्थिती योग्य राहण्याच्या दृष्टिन आवश्यक उपाय योजना करणे.
जिल्हा परिषदे मार्फत राबविण्यात येणाऱ्या जन कल्याणाच्या विविध योजना राबविण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध
असल्याचे खात्री करणे. तसेच जिल्हा परिषदेकडील विविध विभागाकडुन प्राप्त होणाऱ्या गटविमा योजनेची प्रकरणे,
भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन प्रकरणे, तसेच विविध योजनाचे, विकास कामाचे प्रस्ताव प्रशासकीय व निवीदा
मंजुरीसाठी अभिप्रायाकरीता प्राप्त झालेल्या प्रस्तावावर शासन मार्गदर्शक सूचना, शासन परिपत्रके, शासन निर्णय व
महाराष्ट्र जिल्हा परिषद लेखासंहिता १९६८ नुसार अभिप्राय देवुन सक्षम अधिका-याकडे पाठविणे.