बंद

    शिक्षण विभाग (माध्यमिक)

    शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद, यवतमाळ

    1) विभागाबाबत संक्षीप्त माहिती –
    शिक्षण विभाग माध्यमिक जि.प.यवतमाळ या कार्यालया मार्फत यवतमाळ जिल्हयातील खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे कामकाज चालविण्यात येते. या बाबतची माहिती खालील प्रमाणे.

    शाळेची माहिती
    खाजगी अनुदानीत शाळा संख्या 461 शिक्षक संख्या 4452 विद्यार्थी संख्या 160688
    खाजगी विना अनुदानीत व स्वयंअर्थ सहय्यीता शाळा संख्या 191 शिक्षक संख्या 2527 विद्यार्थी संख्या 69921
    खाजगी आश्रम शाळा संख्या 116 शिक्षक संख्या 1005 विद्यार्थी संख्या 31591
    जिल्हा परिषद माध्यमिक शाळा संख्या 34 शिक्षक संख्या 240 विद्यार्थी संख्या 8444
    नगर परिषद व इतर शाळा संख्या 12 शिक्षक संख्या 95 विद्यार्थी संख्या 5726
    एकूण – शाळा संख्या 814, शिक्षक संख्या 8319, विद्यार्थी संख्या 276370

    विभागाअंतर्गत मंजुर पदे खालील प्रमाणे.
    1) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) – 01
    2) उप शिक्षणाधिकारी (माध्यमिक) – 03
    3) अधिक्षक (राप) -01
    4) लघु लेखक – 01
    5) सहाय्यक शिक्षण उप निरीक्षक – 01
    6) जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक 01
    7) सहाय्यक प्रशासन अधिकारी – 01
    8) कनिष्ठ लेखा अधिकारी – 01
    9) वरिष्ठ सहाय्यक – 03
    10) वरिष्ठ लिपीक -02
    11) वरिष्ठ सहाय्यक लेखा -01
    12) कनिष्ठ सहाय्यक लेखा – 01
    13) कनिष्ठ सहाय्यक – 04
    14) वहान चालक – 01
    15) परिचर – 05

    शाळा संहिता नियम 1979 अन्वये शिक्षण संस्थे अंतर्गत खाजगी अनुदानित व विनाअनुदानित माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यंच्या आस्थापना विषयक सर्व बाबीचे कामकाजावर सनियंत्रण ठेवणे.

    क्षेत्रीय अधिकारी मार्फत जिल्हयातील संपुर्ण शाळेला शाळा भेटी देवून शाळेची तपासणी करुन केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्वाच्या कार्यक्रम प्रकल्पाना समक्ष भेटी देवून त्यांच्या अमलबाजावणी व प्रगतीची पाहणी करुन त्यांचे पर्यवेक्षण करणे. तसेच शाळा भेटी दरम्यान महत्वाचे घटकासंबंधी त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे. शाळेतील शिक्षकांच्या शैक्षणिक कामकाजाच्या अनुभवावर व त्यावर येणाऱ्या अडचणी व त्यांनी मांडलेल्या सुचना गांभीर्याने घेवून त्यावर योग्य ती कार्यवाही तात्काळ करणे.

    2) माहिती अधिकार अधिनियम 2005

    3) कार्यक्रम / उपक्रम
    मानव विकास कार्यक्रम
    शिक्षणविभाग (माध्यमिक ) जि.प.यवतमाळ या कार्यालया मार्फत मानव विकास मिशन कार्यक्रमां अंतर्गत जिल्हयातील एकूण 9 (वणी , मारेगांव, झरी पांढकरवडा , घाटंजी आर्णी राळेगांव , कळंब, यवतमाळ ) तालुक्याकरिता मानव विकास मिशन कार्यक्रमाअंतर्गत वर्ग 12 वी पर्यंतचे विद्यार्थीनां मोफत सायकल वाटप करण्यात येतात, तसेच एस.टी.महामंडळाच्या बसव्दारे वर्ग 12 वी पर्यंत्च्या विद्यार्थींना प्रवासाची सुविधा उपल्ब्ध करुन देण्यात येतात.

    मराठी भाषा पंधरवाडा
    शिक्षणविभाग (माध्यमिक ) जि.प.यवतमाळ या कार्यालया मार्फत मराठी भाषा पंधरवाडा अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, शासनाने आदेशीत केलेल्या उपक्रमांची अमलबाजावणी या विभागामार्फत खाजगी माध्यमिक / उच्च् माध्यमिक शाळेमधुन करुन घेण्यात येते.
    पुरस्कार
    शिक्षणविभाग (माध्यमिक ) जि.प.यवतमाळ या कार्यालया मार्फत यवतमाळ जिलहयातील खाजगी माध्यमिक शाळेतील उपक्रम शिक्षकांचे सावित्रीमाई आदर्श शिक्षक पुरस्काराकरिता प्रस्ताव मागवून शासानास शिफारस करण्यात येते.
    जिल्हा विज्ञान प्रदर्शनी
    शिक्षणविभाग (माध्यमिक ) जि.प.यवतमाळ या कार्यालया मार्फत विद्यार्थ्यांमध्ये वेज्ञानिक दृष्टीकोण विकासीत होण्यासाठी तालुकास्तरावर विज्ञान प्रदर्शन घेवून त्यामधील विजेत्या विदयार्थ्याचे जिल्हा स्तरीया विज्ञान प्रदशर्नात सहभागी करुन दरवर्षी तालुका स्तरीय व जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन मेळावा आयोजीत केला जातो. व विजेता विदयार्थ्याना प्रोत्हासन पर बक्षीस वितरीत केल्या जाते. जिल्हयास्तरीय विजेत्या विदयार्थ्यांची निवड करुन राज्यस्थतरीय