बंद

    समाजकल्याण विभाग.

    समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ

    सामाजिक न्याय व विशेष् सहाय्य विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. सदर योजनांची अंमलबजावणी करण्याकरीता जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद अंतर्गत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे कार्यालय असुन,या कार्यालयात ग्रामीण भागातील लोकांचा समाजातील शेवटच्या घटकाचा विकास व्हावा, या दृष्टीने अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.

    अनुसूचित जाती,विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग , विशेष मागास प्रवर्ग,दिव्यांग निराश्रीत इत्यादींचा सामाजिक, आर्थीक,शैक्षणीक विकास व्हावा हा हेतु समोर ठेवुन तसेच समाजामध्ये महिला, लहान मुले,वयोवृध्द व्यक्ती यांना संरक्षण देण्यात यावे व त्यांचे जीवनमान उंचवावे याकरीता शासन जातीने प्रयत्न करीता असुन,त्याकरीता समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद मार्फत खलील प्रमाणे योजनांची अंमलबजावणी करण्यात येते.

    जिल्हा समाज कल्याण योजना

    1. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना :-
    2. सदर योजना फक्त मुलींसाठी असुन या कार्यालयात अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आहे. वर्ग 5 वी ते 7 वी करीता प्रती महिना रु.60/- 10 महिण्यां करीता देण्यात येत असुन वर्ग 8 वी ते 10 करीता प्रती महिना रु 100/- 10 महिण्या करीता देण्यात येतात.

    3. अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती योजना
    4. अस्वच्छ व्यवसायात काम करणारे,अस्वच्छ व्यवसायाशी परंपरेने संबंधित सफाईगार, कातडी सोलणे,कातडी कमावणे या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींच्या पाल्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.ही शिष्यवृत्ती सर्व जाती धर्माला लागु आहे.

    5. आंतरजातीय विवाह योजना :-
    6. समाजातील जातीय भेदभाव दूर करणे आणि एकात्मतेची भावना जागृत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत, सवर्ण, हिंदू आणि एससी/एसटी/व्हीजे/एनटी यांच्यातील आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी, अस्पृश्यता निर्मूलनाचा एक भाग म्हणून पात्र जोडप्यांना एकूण 50 हजार रुपये देण्यात यतात.

    7. जिल्हा परिषदेच्या सेस योजना
    8. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत सर्वसामान्य नागरिकांसाठी ग्रामीण भागासाठी 20% सेस जीआर नुसार विविध योजना राबविण्यात येत आहेत. जसे की,सायकल, झेरॉक्स मशिन यांसारख्या योजने वर जिल्हा परिषद समाज कल्याण कडून 100% अनुदान देण्यात येते.

    9. अनुदानित वसतिगृहे
    10. समाजातील मागासवर्गीय दुर्बल घटकातील इयत्ता 5-10 इयत्तेत शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी अनुदानित वसतिगृहे स्वयंसेवी संस्थांकडुन चालविल्या जातात. विद्यार्थ्यांना वसतिगृहात जेवन तसेच इतर सुविधा मोफत दिल्या जातात.

    11. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजना
    12. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजना सन 1974-75 पासुन सुरु करण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती व नाबौध्द घटकांच्या मुलभुत गरजा भागविण्यासाठी प्रत्येक अनुसुचित जाती व नवबौध्द वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा, गटारे स्वच्छता विषयक सोय, जोड रस्ते, अंतर्गत रस्ते, समाज मंदीर, इ. पायाभुत व्यवस्था करुन त्यांचा सर्वागीण विकास करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.