विभागासंदर्भात माहीती:-
दिनांक 1 मे 1962 ला जिल्हा परिषद यवतमाळ स्थापना झाली असुन तेव्हापासुन शिक्षण विभाग, जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहे. आधी या जि.प.मध्ये एकच शिक्षण विभाग होता तथापि, जिल्हयाचे क्षेत्रफळ मोठे असल्याने व एकुण 16 पं.स.असल्यामुळे या जि.प.अंतर्गत शिक्षण विभाग (प्राथमिक) व शिक्षण विभाग (माध्यमिक) असे एकुण 2 विभाग करण्यात आले. या विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाचे कार्य करण्यात येते. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे या विभागाचे खाते प्रमुख असुन विभागामार्फत होणारी कामे योग्य प्रकारे व चांगल्या प्रकारे करुन घेण्यासाठी या विभागामध्ये तीन विभाग आहेत.
- आस्थापना विभाग
- लेखा विभाग
- पेंन्शन विभाग
- आस्थापना विभाग :- आस्थापाना शाखेमध्ये शिक्षकांच्या बदल्या, पदोन्नत्या, कर्मचा- यांच्या सेवाविषयक बाबी, रजा प्रकरणे, वार्षीक वेतनवाढ, वेतन देयके, प्रवास भत्ता देयके, वेतन निश्चीती, सेवा निवृत्ती प्रकरणे, बदल्या, नियुक्त्या, पदोन्नती, भविष्य निर्वाह निधी, पत्र व्यवहार इत्यादी कामे केली जातात.
- लेखा विभाग :- लेखा शाखेमध्ये प्राप्त निधीनुसार सर्व पंचायत समित्यांना वंटन वाटप करणे. देयके पारीत करणे, नोंदवहया, हिशेब ठेवणे, भांडार शाखेत वस्तु खरेदी करणे हिशेब ठेवणे इत्यादी कामे पाहीली जातात.
- पेन्शन विभाग :- पेंन्शन शाखेत 16 ही पंचायत समिती मधुन सेवा निवृत्त झालेल्या शिक्षकांचे सेवा निवृत्ती वेतन, अंशराशिकरण, उपदान, रजा रोखकीकरण, वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी मंजुर करणे तसेच इत्यादी कामे पाहीली जातात.