परिचय
भारत हा कृषि प्रधान देश असून देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा 13.7% आहे. कृषि उत्पन्नामध्ये वाढ होणे आवश्यक असून त्यासाठी शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, खते, औजारे, पीक संरक्षण औषधे इ. बाबी शेतक-यांना माफक दरात योग्यवेळी उपलब्ध होणे व त्यासाठी शेतक-यांमध्ये जाणीव, जागरुकता निर्माण करणे हे उद्दिष्ट ठेऊन कृषि विभाग, जिल्हा परिषद, यवतमाळ कार्यरत आहे. यवतमाळ जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 13,51,926 हेक्टर असून निव्वळ पिकाखाली सर्वसाधारण क्षेत्र 9,60,500 हेक्टर आहे. खरीप पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र 9,02,072 हेक्टर असून रब्बी 1,32,316 हेक्टर, उन्हाळी पिकाचे क्षेत्र 16,460 हेक्टर आहे. जिल्ह्यात एकूण १६ पंचायत समित्या असून मुख्य पिके कापूस, ज्वार, तूर , सोयाबीन आहेत. जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान 926.80 मी.मी. असून 1 जून ते 31 आक्टोंबर पर्यंतचे सरासरी पर्जन्यमान 926.70 मी.मी. आहे. कृषि विभाग हा जिल्हा परिषदेचा एक महत्वपूर्ण विभाग असून कृषि विकास अधिकारी हे सद्स्य सचिव म्हणुन या विभागाचे काम पाहतात. शेतक-याचा सर्वांगीण विकास करून त्यांचा सामाजीक व आर्थिक स्तर उंचविण्याचे दृष्टिने वैयक्तीक लाभाच्या व लोकोपयोगी योजना सातत्याने राबविल्या जातात. या योजना ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य या विभागामार्फत केल्या जाते. अनुसुचित जाती / नव बौद्ध घट्कातील शेतक-याना अर्थसहाय्य देण्याची योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, आदिवासी उपाय योजना (टी.एस.पी.) व ( ओ. टी. एस. पी.) योजना या विभागामार्फत राबविण्यात येतात. तसेच राष्ट्रीय बायोगॅस कार्यक्रम, जिल्हा परिषद अंतर्गत सेस फंड योजना दरवर्षी / सातत्याने राबविण्यात येतात. बि-बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके या बाबतीत पुरवठा व गुणनियंत्रण कामांची जबाबदारी कृषि विभाग, जिल्हा परिषद, यवतमाळ मार्फत पार पाडण्यात येते.
अ.क्र. | महिना | प्रत्यक्ष झालेला पाऊस | एकुण पावसाचे दिवस |
---|---|---|---|
१ | जुन | १८२ | १७ |
२ | जुलै | ४२४ | २२ |
३ | ऑगष्ट | १७३ | १५ |
४ | सप्टेंबर | १४६ | ५ |
खरीप / रब्बी हंगाम-पिक पेरणी अहवाल
अ.क्र. | पिकाचे नांव | लागवडी खालील क्षेत्र (हेक्टर) |
---|---|---|
१ | सोयाबीन | २,७२,४९८ |
२ | कापुस | ४,८३,९९८ |
३ | तुर | १०६३५३ |
४ | ज्वारी | २९३८ |
५ | उडीद | १८७५ |
६ | मुंग | १९५७ |
७ | इतर पिके | ३२४५३ |