बंद

    लोकसेवा हक्क अधिनियम

    महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम

    महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे. वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नविन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत. पात्र नागरीकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांना वरीष्ठांकडे प्रथम व द्वितीय अपिल करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपिल करता येते. कसूरदार अधिकाऱ्यास प्रतिप्रकरण रु. 5000/- पर्यंत दंड होऊ शकतो. या विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसुचित सेवांची यादी सोबतच्या प्रपत्रात दिली आहे.

    महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची वेबसाईट खालीलप्रमाणे आहे :-https://aaplesarkar.mahaonline.gov.in

    महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम (आरटीएस) – 2015
    अ.क्र. विभागाचे नाव लोकसेवेचे नांव लोकसेवा पुरविण्यासाठीची कालमर्यादा (कामकाजाचे दिवस) अर्जाचा विहित नमुना व असल्यास शुल्क पदनिर्देशित अधिकारी प्रथम अपील प्राधिकारी व्दितीय अपील प्राधिकारी
    1 महिला व बाल कल्‍याण विभाग अंगणवाडीतील गरोदर मातांची नोंदणी करणे 1 दिवस निशुल्क अंगणवाडी सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका बाल विकास प्रकल्‍प अधिकारी
    2 महिला व बाल कल्‍याण विभाग 06 महिने ते 3 वर्षापर्यंतच्‍या मुलींची अंगणवाडीत नोंदणी करणे 1 दिवस निशुल्क अंगणवाडी सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका बाल विकास प्रकल्‍प अधिकारी
    3 महिला व बाल कल्‍याण विभाग 03 वर्षे ते 6 वर्षापर्यंतच्‍या मुलींची अंगणवाडीत नोंदणी करणे 1 दिवस निशुल्क अंगणवाडी सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका बाल विकास प्रकल्‍प अधिकारी
    4 महिला व बाल कल्‍याण विभाग किशोर शक्‍ती योजनेतंर्गत मुलींची नोंदणी करणे 1 दिवस निशुल्क अंगणवाडी सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका बाल विकास प्रकल्‍प अधिकारी
    5 आरोग्य विभाग जननी सुरक्षा योजना प्रसुतीनंतर ७ दिवस निशुल्क वैद्यकीय अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी
    6 आरोग्य विभाग जननी शिशु सुरक्षा योजना ७ दिवस निशुल्क वैद्यकीय अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी
    7 आरोग्य विभाग शुश्रृषागृह नोंदणी (महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्ट-1949 कलम 3) ७ दिवस निशुल्क वैद्यकीय अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी
    8 आरोग्य विभाग 1) जनुकीय समुपदेशन केंद्र 2) जनुकीय प्रयोगशाळ 3) जनुकीय दवाखाना 4) अल्ट्रासाउंड दवाखाना व इमेजिंग सेंटर या सेवांची पि.सी.पी.एन.डी.टी. ॲक्ट 1994, कलम 18 अंतर्गत नोंदणी ७ दिवस निशुल्क वैद्यकीय अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी
    9 आरोग्य विभाग मानवी अवयव प्रत्यारोपन कायदा 1994, खंड 15 अंतर्गत रुग्णालयाची नोंदणी/पुननोंदणी 70 दिवस निशुल्क वैद्यकीय अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी
    10 शिक्षण विभाग (प्राथमिक) विद्यार्थ्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर प्रतीस्वाक्षरी देणे महाराष्ट्र राज्याबाहेर शिक्षणाकरीता (प्राथमिक शाळेसाठी) 7 दिवस निशुल्क श्री.दिलीप कुडमेथे वरिष्ठ सहाय्यक श्रीमती निता गावंडे उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.प्रकाश मधुसूदन मिश्रा शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
    11 शिक्षण विभाग (प्राथमिक) विद्यार्थ्याचे नाव/जन्म तारीख/नाव/तत्सम यामध्ये बदल/दुरुस्ती मान्यता आदेश(प्राथमिक शाळा) 7 दिवस निशुल्क श्री.दिलीप कुडमेथे वरिष्ठ सहाय्यक श्रीमती निता गावंडे उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.प्रकाश मधुसूदन मिश्रा शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
    12 शिक्षण विभाग (प्राथमिक) खाजगी अनुदानीत शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वैद्यकिय खर्चाच्या देयकाच्या प्रतीपूर्ती रुपये दोन लाख पर्यंतचे मंजुरीचे आदेश देणे (खाजगी प्राथमिक शाळेसाठी) 7 दिवस निशुल्क श्री.दिलीप कुडमेथे वरिष्ठ सहाय्यक श्रीमती निता गावंडे उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.प्रकाश मधुसूदन मिश्रा शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
    13 शिक्षण विभाग (प्राथमिक) खाजगी प्राथमिक शाळामधील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वैयक्तिक मान्यता आदेश 30 दिवस निशुल्क श्री.दिलीप कुडमेथे वरिष्ठ सहाय्यक श्रीमती निता गावंडे उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.प्रकाश मधुसूदन मिश्रा शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
    14 शिक्षण विभाग (प्राथमिक) खाजगी प्राथमिक शाळामधील मुख्याध्यापक पदावरील पदोन्नतीस मान्यता आदेश 30 दिवस निशुल्क श्री.दिलीप कुडमेथे वरिष्ठ सहाय्यक श्रीमती निता गावंडे उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.प्रकाश मधुसूदन मिश्रा शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
    15 लघु पाटबंधारे विभाग पाणी वापर संस्थेस देय पाणी हक्क मंजुरी देणे 15 दिवस (हंगाम सुरु झाल्या नंतर) निशुल्क संबंधित जलसंधारण अधिकारी जिल्हा जलसंधारण अधिकारी संबंधित उपविभागीय जलसंधारण अधिकारी जिल्हा जलसंधारण अधिकारी
    16 लघु पाटबंधारे विभाग बिगर सिंचन पाणीपट्टी थकबाकी दाखला देणे 15 दिवस निशुल्क संबंधित जलसंधारण अधिकारी जिल्हा जलसंधारण अधिकारी संबंधित उपविभागीय जलसंधारण अधिकारी जिल्हा जलसंधारण अधिकारी
    17 लघु पाटबंधारे विभाग पाणी वापर संस्थेस पाणी पट्टी थकबाकी दाखला देणे 15 दिवस दिवस निशुल्क संबंधित जलसंधारण अधिकारी संबंधित उपविभागीय जलसंधारण अधिकारी जिल्हा जलसंधारण अधिकारी
    18 लघु पाटबंधारे विभाग पाणी पट्टी देयक तक्रार निरासन करणे 15 दिवस निशुल्क संबंधित जलसंधारण अधिकारी संबंधित उपविभागीय जलसंधारण अधिकारी जिल्हा जलसंधारण अधिकारी
    19 लघु पाटबंधारे विभाग लाभक्षेत्राचा दाखला देणे 15 दिवस निशुल्क संबंधित जलसंधारण अधिकारी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी अप्पर आयुक्त जलसंधारण
    20 लघु पाटबंधारे विभाग ग्रामपंचायत/जिल्हा परिषद/नगर पालिका/नगर परिषद/नगर पंचायत/कटक मंडळे (Cantonment Board) यांना घरघुती वापर परवाना देणे 3 दिवस निशुल्क संबंधित जलसंधारण अधिकारी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी अप्पर आयुक्त जलसंधारण
    21 लघु पाटबंधारे विभाग महानगर पालिका, खाजगी विकासक, विशेष नगर विकास प्रमुख यांना घरघुती / औद्योगिक पाणी वापर परवाना देणे 3 दिवस निशुल्क संबंधित जलसंधारण अधिकारी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी अप्पर आयुक्त जलसंधारण
    22 लघु पाटबंधारे विभाग औद्योगिक प्रयोजनासाठी वापर परवाना देणे 6 महिने निशुल्क संबंधित जलसंधारण अधिकारी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी अप्पर आयुक्त जलसंधारण
    23 समाज कल्याण विभाग अनुदानित दिव्यांगाच्या शाळा/कर्मशाळेतील रिक्त पदे भरण्याकरीत स्वयंसेवीसंस्थांना नाहरकत प्रमाणपत्र देणे 3 महीने निशुल्क आयुक्त दिव्यांग कल्‍याण म.रा.पुणे सचिव ,दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय म.रा.मुंबई मा.मंत्री,दिव्यांग कल्याण विभाग
    24 समाज कल्याण विभाग दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 49 मधील तरतुदीप्रमाणे दिव्यांग क्षेत्रात पुनर्वसनविषयक कार्यकरण्यसाठी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र देणे 3 महीने निशुल्क आयुक्त दिव्यांग कल्‍याण म.रा.पुणे सचिव ,दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय म.रा.मुंबई मा.मंत्री,दिव्यांग कल्याण विभाग
    25 पंचायत विभाग अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय जन्म नोंद दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी
    26 पंचायत विभाग अंतर्गत ग्रामपंचायत मृत्यू नोंद दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी
    27 पंचायत विभाग अंतर्गत ग्रामपंचायत विवाह नोंद दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी
    28 पंचायत विभाग अंतर्गत ग्रामपंचायत दारिद्र रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी
    29 पंचायत विभाग अंतर्गत ग्रामपंचायत नमुना 8 हा उतारा 5 दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी
    30 पंचायत विभाग अंतर्गत ग्रामपंचायत निराधार असल्याचा दाखला 20 दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी