बंद

    महिला व बाल कल्‍याण विभाग.

    महिला व बाल कल्‍याण विभाग, जिल्हा परिषद, यवतमाळ

    विभागाचे नाव – महिला व बाल कल्‍याण विभाग
    खाते प्रमुखाचे पदनाम – उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मबाक)
    विभागाचा दुरध्वनी क्रमांक – 07232-245318
    विभागाचा ई-मेल – icdszp_yavt@rediffmail.com / icdszpyavt@gmail.com

    बाल कल्याण विभाग हा ग्रामिण भागात या जिल्ह्यातील एकुण 2693 अंगणवाडी केन्द्रावर 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना पुरक पोषण आहार,उपचारशास्त्र मुलभुत आहार (T.H.R.) तसेच स्तनदा माताना पुरक पोषण आहार पुरविणे तसेच कुपोषीत बालकांना संदर्भ सेवा देणे ग्रामिण भागातील गरोदर माता यांना पुरक पोषण आहार, आरोग्य तपासणी 3 ते 6 वयोगटातील मुलाना पुर्व शालेय शिक्षण देणे आणि किशोरवयीन मुलींना आहार, आरोग्य शिक्षण देणे ईत्यादी योजना राबविण्यात येतात . या विभागाचे खाते प्रमुख म्हणुन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) हे आहेत.

    महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना.

    • पुरक पोषण आहार योजना.

    अंगणवाडीतील सर्व लाभार्थ्यांना लाभ दिल्या जातो.

    • म.बा.क. समितीकरीता अनुदान.

    समितीने ठरविलेल्या योजना राबविण्यात येतात.

    • आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार.

    जिल्हयातील उत्कृष्ट काम करणाऱ्या सेविकेस रु.5000/-बक्षीस दिल्या जाते.

    • महिला मेळावे.

    जिल्हास्तर,प्रकल्प स्तर तसेच अंगणवाडी स्तरावर विविध मेळावे घेण्यात येतात.

    • महिला समुपदेशन केंद्र चालविणे :-

    कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा अंतर्गत महिला आयोगाचे मंजुरीनुसार जि.प. अंतर्गत जिल्हा स्तरावर सलोखा समुपदेशन केंद्र, तालुकास्तरावर १. दारव्हा, नेर, बाभुळगाव असे एकुण ४ समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. सदर समुपदेशन केंद्र‌द्वारे अन्यायग्रस्त ग्रामीण भागातील महिलांवरील कुटुंबातील मारहाण, लैंगिक छळ व इतर तन्हेने त्रासलेल्या तसेच मानसिक दृष्ट्या असंतुलीत महिलांच्या सामाजिक, मानसशास्त्रीय कायदेशीर समुपदेशन देणे व मदत करणे. त्यांना न्याय मिळवून देण्याचे कामे केल्या जातात.

    सदर समुपदेशन केंद्रामध्ये एक समन्वयक व एक विधीतज्ञाची नेमणूक संबंधीत समुपदेशन केंद्राणे केलेली असून त्यांचे मानधना करिता तालुकास्तरावर दरमहा रुपये ९००० व जिल्हास्तरावर रु.१२००० या प्रमाणे प्रत्येकी समन्वयक व विधी तज्ञाकरिता समुपदेशनकेंद्र जिप सेस मधुन मानधन उपलब्ध करून देण्यात येते.

    • मुलींना व महिलांना व्यावसायिक तांत्रिक प्रशिक्षण देणे :-

    ग्रामीण भागातील मुली व महिला व्यावसायिक दृष्ट्या सक्षम होण्याचे दृष्टीने ब्युटी पार्लर, शिवणकामाचे प्रशिक्षणाची देण्याची योजना राबविण्यात येते.
    पात्रतेच्या अटी :-

    1. प्रशिक्षण पुर्ण केलेल्या लाभार्थ्यांना ९० % अनुदान व १० % लाभार्थी हिस्सा राहील.
    2. प्रशिक्षण समाधानकारक पुर्ण केल्याचे संस्थेचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
    3. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.१२००००/- पर्यंत असावे. तहसीलदार यांचा उत्पनाचा दाखला.
    4. प्रशिक्षणार्थी ग्रामीण भागातील मुलगी अथवा महिला असावी.
    5. महिला व बाल कल्याण समितीद्वारे लाभार्थ्याची निवड करण्यात येते.
    6. प्रशिक्षणाकरिता शासन मान्यता प्राप्त संस्थेची ई-निविदे‌द्वारे निवड करून त्यांचे मार्फत निवड केलेल्या लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते.
    7. १०% लाभार्थी हिस्सा वगळून ९०% अनुदान संस्थेस देण्यात येईल.
    • ग्रामिण भागातील महिलांकरिता शिलाई मशिन पुरविणे :-

    ग्रामिण भागातील मुलींना व महिलांना आत्मनिर्भर बनविणे करीता शिलाई मशीनचा लाभ द्वारे देणे.
    लाभार्थी निवडी करिता पात्रतेच्या अति व शर्ती :-

    1. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.१२००००/- पर्यंत असावे. तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला.
    2. लाभार्थ्याने शिवणक्लास प्रशिक्षण समाधानकारक पूर्ण केल्याचे संस्थेचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
    3. निवड झालेल्या लाभार्थ्यांनी लाभार्थी हिस्सा म्हणून १०% रक्कम भरणे आवश्यक आहे.
    4. रहिवासी दाखला, जातीचा दाखला अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
    5. डिबीटी च्या अनुषंगाने आवश्यक असलेली कागदपत्रे.
    • ग्रामिण भागातील गरोदर व स्तनदा मातांना अतिरिक्त आहार पुरविणे

    अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदणी झालेल्या गरोदर व स्तनदा मातांना शरीरातील हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढविणे व कुपोषणाचे प्रमाण कमी करणे करिता ग्रामीण भागातील गरोदर स्तनदा मातांना अतिरिक्त आहर पुरविणे हि योजना विभाग मार्फत राबविण्यात येते.
    लाभार्थी निविडी करिता पात्रतेच्या अटी व शर्ती :-

    • अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदणी झालेल्या गरोदर व स्तनदा मातांकरिता
    • ग्रामिण भागातील महिला
    • अंगणवाडी केंद्राकरिता साहित्य खरेदी :-

    अंगणवाडी करीता दिनांक २४ जानेवारी २०१४ च्या शासन निर्णया अन्वये जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्र करिता विविध उपयोगी साहित्य खरेदी करणे. तसेच महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषद यवतमाळ यांचे कडून जि.प.कडून, जिल्हा नियोजन समिती व शासनाकडून प्राप्त अनुदानातून दि. २४ जानेवारी २०१४ चे शासन निर्णयामधील विविध योजना वेळोवेळी कार्यन्वत केल्या जातात.

    • लेक लाडकी योजना

    मुलीच्‍या सक्षमीकरणासाठी ही योजना दि.१.४.२०२३ पासून सुरु करण्‍यात आलेली आहे. पिवळया व केशरी रेशनकार्डधारक कुटूंबान मुलीच्‍या जन्‍मानंतर टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने अनुदान देण्‍यात येवून लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष झाल्‍यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्‍यात येतील.
    मुलीचा जन्‍म झाल्‍यावर रु.५०००/-
    मुलगी पहिलीत गेल्‍यावर रु.६०००/-
    मुलगी सहावीत गेल्‍यावर रु.७०००/-
    मुलगी ११ वीत गेल्‍यावर रु.८०००/-
    मुलीचे १८ वर्षे पूर्ण झाल्‍यावर रु.७५०००/-
    असा एकूण लाभ रु.१०१०००/- देण्‍यात येतील.

    योजनेच्‍या अटी व शर्ती –

    1. ही योजना पिवळया व केशरी रेशनकार्ड धारक कुटूंबामध्‍ये १.४.२०२३ रोजी व त्‍यानंतर जन्‍माला येणा-या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्‍यास मुलीला लागू राहील.
    2. पहिल्‍या अपत्‍याच्‍या तिस-या हप्‍त्‍यासाठी व दुस-या अपल्‍याच्‍या दुस-या हप्‍त्‍यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता/पित्‍याने कुटूंब नियोजन शस्‍त्रक्रीया प्रमाणपत्र् सादर करणे अनिवार्य आहे.
    3. तसेच दुस-या प्रसुतीच्‍या वेळी जुळी अपत्‍य जन्‍माला आल्‍यास एक किंवा दोन्‍ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्‍यानंतर माता/पित्‍याने कुटूंब नियोजन शस्‍त्रक्रीया करणे आवश्‍यक राहील.
    4. लाभार्थी कुटूंब महाराष्‍ट्र राज्‍याचे रहिवासी असेण आवश्‍यक आहे.
    5. लाभार्थी कुटूंबाचे वार्षिक उत्‍पन्‍न रक्‍कम रु.१ लक्ष पेक्षा जास्‍त नसावे.

    आवश्‍यक कागदपत्रे –

    1. लाभार्थीचा जन्‍माचा दाखला
    2. तह‍सीलदाराचे कुटूंब प्रमुखाचा उत्‍पन्‍नाचा दाखला
    3. लाभार्थी धार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील.)
    4. पालकाचे आधार कार्ड
    5. बॅंकेच्‍या पासबुकच्‍या पहिल्‍या पानाची छायांकीत प्रत
    6. रेशन कार्ड (पिवळया अथवा केशरी रेशन कार्ड छायांकीत प्रत
    7. मतदान ओळखपत्र (शेवटच्‍या लाभाकरिता १८ वर्षे पूर्ण झाल्‍यानंतर)
    8. संबंधित टप्‍प्‍यावरील लाभाकरीता शिक्षण घेत असल्‍याबाबत संबंधीत शाळेचा दाखला (बोनाफाईड)
    9. कुटूंब नियोजन शस्‍त्रक्रिया प्रमाणपत्र