बांधकाम विभागाकडे असलेले रस्ते व सदर रस्त्यांच्या देखभाल दुरुस्ती करिता राबविण्यात येणा-या योजनांची माहीती खालीलप्रमाणेः-
यवतमाळ जिल्हा परिषद बांधकाम विभाग १ व २ मिळून एकूण १६ तालूके असून बांधकाम विभाग क्रं१ कडे एकूण ०९ तालूके आहेत.(यवतमाळ, बाभूळगांव,कळंब,राळेगांव,पांढरकवडा, घाटंजी,मारेगांव,वणी व झरी (जामणी) असून या तालूक्यातील रस्त्यांची तथा इतर बांधकामे करण्याकरिता जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र.१ कडे इतर जिल्हा मार्ग व ग्रामिण मार्ग अशा दर्जाच्या रस्त्यांची कामे देखभाल व दुरुस्ती करिता शासनाने दिलेली आहेत.रस्ते विकास आराखडा सन २००१-२०२१ मंजूर असून त्यानुसार इतर जिल्हा मार्गाची लांबी 1345.66 कि.मी. असून त्यापैकी डांबरी रस्त्याची लांबी 882.495 कि.मी खडी रस्ते लांबी 124.005 कि.मी. व अपृष्ठांकीत रस्ते लांबी 339.16 इतकी आहे. ग्रामिण मार्गाची एकूण लांबी 3661.28 कि.मी. इतकी असून डांबरी रस्त्याची लांबी 1548.405 कि.मी. खडी रस्ते लांबी 321.915 कि.मी व अपृष्ठांकीत लांबी 1790.96 कि.मी. इतकी आहे. असे एकूण 5006.94 कि.मी लांबीचे रस्ते देखभाल व दुरुस्ती करिता आहेत.
- ३०५४ व ५०५४ मार्ग व पुल (आदिवासी/बिगर आदिवासी):-.
इजिमा व ग्रामा दर्जाच्या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याकरिता ३०५४ व ५०५४ मार्ग व पुल बिगर आदिवासी योजना व आदिवासी योजना मधून अनुदान प्राप्त होत असते. सन २००८-०९ पर्यंत असे अनुदान प्राप्त होत होते परंतु आता हे अधिकार जिल्हा वार्षिक योजना मधून जिल्हा नियोजन मंडळ यांना देण्यात आलेले आहे. व त्यानुसार २००९ पासून या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्ती करिता अनुदान जिल्हा नियोजन समिती मार्फत प्राप्त होत आहे.या योजनेमधून ज्या रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे अशा रस्त्यांचा पि.सी.आय काढून पि.सी.आय प्रमाणे मा.खासदार,मा.आमदार किंवा मा.पदाधिकारी यांनी सुचविलेल्या रस्त्यांची पाहणी करुन कामांचे अंदाजपत्रक तयार करुन अशा रस्त्यांचा कार्यक्रम शासननिर्णय क्रमांक जिवायो/१००७/प्र.क्र.३१/का १४४४/दिनांक १६/०२/२००८ अन्वये व वेळोवेळी दिलेल्या शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन या योजनोचा कार्यक्रम तयार करुन मा.जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती ला सादर केला जावून जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा मा.पालकमंत्री यांचे अध्यक्षतेत मंजूर करुन हया योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. या संदर्भात म.शा.ग्रामविकास विभागाचे शासन निर्णय क्र.जिवायो/२०१५/प्र.क्र.१९१/प.रा.-८ दिनांक ०३/सप्टें/२०१६ व दिनांक २९ ऑक्टों २०१६ अन्वये मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहे. त्यानुसार सन २०१७-१८ पासून या योजनेची अंमलबजावणी करावयाची आहे. जिल्हा परिषदेकडिल रस्त्यांचे तथा इतर कामांना द्यावयाचे प्रशासकीय मंजूरीचे अधिकार हे जिल्हा परिषदेला असल्याने आवश्यक त्या रकमेची कामे मंजूर करुन निवीदा पध्दतीने ही कामे कंत्राटदाराकडून केली जातात व ग्रामिण भागाच्या दळणवळणाकरिता या योजनेचा विशेष लाभ दिल्या जातो.
- रस्ते विशेष दुरुस्ती(गट ब,क,ड,इ):-
सदर योजनेमध्ये इजिमा व ग्रामा रस्त्यांची विशेष दुरुस्ती डांबरी नुतनीकरण, खडी नुतनीकरण , रुंदिकरण, मोरी , रपटयांची बांधकामे व सुधारणा इत्यादी प्रकारची कामे घेतली जातात. जिल्हा परिषदेने प्रस्तावित केलेली कामे शासन स्तरावर मंजूर होतात.
- पुरहानी दुरुस्ती कार्यक्रम :-
पावसाळयामध्ये ग्रामा व इजिमा दर्जाच्या क्षतिग्रस्त झालेल्या रस्त्यांची संबंधित उपविभागाकडून सर्वेक्षण करुन,विभागीय स्तरावर कार्यक्रम तयार करुन जिल्हाधिकारी ,अधिक्षक अभियंता, व शासन स्तरावर सादर केला जातो.शासनाकडून कार्यक्रमास मंजूरात व निधी प्राप्त होताच सदर कामे निविदा पध्दतीने पुर्ण केली जातात.
- आमदार/ खासदार स्थानिक विकास कार्यक्रमः-
या कार्यक्रमा अंतर्गत मा.आमदार /मा.खासदार यांनी सुचविलेली कामे जिल्हा नियोजन विभागामार्फत मंजूर होवून रस्ते ,सामाजिक सभागृह,चावडी ,इमारत ,शाळा वॉल कंम्पाऊंड इत्यादि कामे कंत्राटदाराकडून निविदा मागवून केली जातात.
- तिर्थक्षेत्र /यात्रास्थळ विकास योजना :-
सदरच्या योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन विभागामार्फत क वर्ग तिर्थक्षेत्र ब वर्ग तिर्थक्षेत्रा करिता भक्त निवास बांधणे,संरक्षक भिंत बांधणे, वाहनतळ बांधणे, परिसर विकास करणे, काँक्रीट रस्ता व पाय-यांचे काम करणे,कंम्पाऊंड वॉलचे बांधकाम करणे, पाणिपुरवठा व्यवस्था, सांस्कृतिक भवन, रस्त्यांची सुधारणा करणे, पोच रस्ता, स्वच्छतागृह इत्यादि कामे घेतली जातात.
- सार्वजनिक आरोग्य :-
सदर योजनेअंतर्गत जिल्हा परिषद स्तरावर आरोग्य विभागाच्या इमारती,प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र,वैद्यकीय अधिकारी/कर्मचारी निवासस्थाने प्रसुतीगृह इ. कामे घेतली जातात.
- पशुसंवर्धन योजनाः- :-
सदर योजने अंतर्गत पशु चिकित्सालय अनिवासी व निवासी इमारतींची बांधकामे व दुरुस्तीची कामे घेतली जातात.
- ठक्कर बाप्पा योजना :-
सदर योजने अंतर्गत आदिवासी क्षेत्रातील ग्राम पंचायती ने ठराव घेवून मंजूर करुन घेतलेली कामे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा यांचेकडून या विभागास प्राप्त होतात त्याअनुषंगाने पुढील कार्यवाही विभागीय कार्यालयाकडून करण्यात येते.सदर योजनेतुन अंतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ता व समाज मंदिर, ग्रा.पं.भवन, समाजिक सभागृह यांचे बांधकामे करण्यात येतात.