बंद

    बांधकाम विभाग क्र. २

    बांधकाम विभाग क्र. २, जिल्हा परिषद, यवतमाळ

    विभागाचे नाव – बांधकाम विभाग क्र. २
    खाते प्रमुखाचे पदनाम – कार्यकारी अभियंता
    विभागाचा दुरध्वनी क्रमांक – 07232-242385
    विभागाचा ई-मेल – zpy.eew२[at]gmail[dot]com

    Flowchart

    बांधकाम विभाग हा रस्ते,ईमारती,रोहयो,स्था.वि.कार्यक्रम,तिर्थक्षेत्र स्थळ, प्रा.मा.केंद्र,उपकेंद्र,विदर्भ वैज्ञानिक विकास मंडळ, नवनिर्मीत पंचायत समित्या, खनिज विकासाची तसेच ईत्यादि योजना राबविणे विभागाच्या कार्यक्षेत्रातील 7 तालुक्या अंतर्गत रस्त्यांचे कामे देखभाल वदुरुस्तीची कामे विहीत मुदतीत पुर्ण करणे,जिल्हा परिषदेच्या मालकिच्या ईमारती प्रा.आ.केंद्र,उपकेंद्र,दवाखाने,ईमारतीची वेळेवर देखभाल व दुरस्ती करणे,पशुवैदयकीय दवाखान्यांची बांधकाम व देखभाल दुरुस्तीची कामे विहीत कालावधीत पुर्ण करणे या संबंधित आहे. या विभागाचे खाते प्रमुख म्हणुन कार्यकारी अभियंता हे आहेत.

    बांधकाम विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना / कामकाज.

    1. रस्ते,ईमारती,रोहयो,स्था.वि.कार्यक्रम,तिर्थक्षेत्र स्थळ, प्रा.मा.केंद्र,उपकेंद्र,विदर्भ वैज्ञानिक विकास मंडळ, नवनिर्मीत पंचायत समित्या, खनिज विकासाची तसेच ईत्यादि योजना राबविणे.
    2. दरवर्षी जिल्हा परिषद मधिल सर्व कर्मचा-यांचे जिल्हा परिषद कामकाज संबंधीत आय.एस.ओ.संदर्भात प्रशिक्षण देणे.
    3. कर्मचा-यांचे आस्थापना विषयक बांबींचा निपटारा करणे.
    4. सेवा निवृत्‍ती प्रकरणे निवृत्‍ती पुर्वी 6 महिने पुर्वी निपटारा करणे.
    5. स्थानिक निधी लेखा आक्षेप, पंचायत राज समित्या आक्षेप या आर्थिक वर्षात निपटारा करणे.

    विभागाचे धोरण :-

    जिल्हा परिषद च्या गरजा व अपेक्षा योग्य रितीने समजाउन घेउन सेवा पुरविण्यास आम्ही बांधील आहोत. ही बांधीलकी पुर्ण करणे साठी आमचे गुणवत्ता धोरण खालील प्रमाणे आहेत.

    1. सेवेच्या गुणवत्तेत व अभ्यांगताच्या समाधानात वाढ करणे.
    2. प्रचलित शासन निर्णय अधिनियम मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे.

    या कर्मचा-यांचे सांघिक कामगिरीत प्रोत्साहन देणे त्यांचे गुणवत्ते बाबत जागरुकता निर्माण करणे, त्यांचे सुरक्षेविषयी हमी देणे,पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातुन जनमानसात कार्यालयाची प्रतिमा वृध्‍दीगंत करणे.

    कार्य :-

    शासन स्तरावरील व जिल्हा परिषद स्तरावरील रस्ते ,ईमारतीचे निर्माण,देखभाल व दुरुस्ती,लोकोपयोगी कामे, ईत्यादि योजना राबविणे .

    कामाचे विस्तृत स्वरुप :-

    रस्ते ,ईमारतीचे सर्वेक्षण करणे ,कामाचे अंदाजपत्रक तयार करणे, तांत्रिक मान्यता देणे, प्रशासकिय मान्यता प्राप्त करणे, कामाच्या निवीदा काढणे,व प्रत्यक्ष काम करणे.

    ईमारती व मालमत्तेचा तपशिल :-

    जिल्हा परिषदेच्या अख्यतारीतील ईमारती.

    उपलब्ध सेवा :-

    रस्ते व ईमारतीचे निर्माण ,देखभाल व दुरुस्ती .