बंद

    ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

    ग्रामिण पाणी पूरवठा विभाग, जिल्हा परिषद, यवतमाळ

    विभागाचे नाव-ग्रामिण पाणी पूरवठा विभाग
    विषय समिती सभपती-मा.अध्‍यक्ष ,जलव्‍यवस्‍थापन व स्‍वच्‍छता समिती.
    कार्यालय प्रमुखाचे पदनाम-कार्यकारी अभियंता
    विभागाचा दुरध्वनी क्रमांक-07232-246900
    विभागाचा ई-मेल- eebnytl@gmail.com

    शासनाचे दिनांक ०६-०३-१९९७ चे आदेशान्वये जि. प. अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली. या विभागा अंतर्गत पुर्वी जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग यवतमाळ, राळेगाव, वणी, पांढरकवडा, पुसद व दारव्हा असे एकुण ६ उपविभाग होते.परंतु पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभागाचे शासन निर्णय क्र. जिपआ2016 प्र.क्र.301/पापु-२३ दिनांक 28 डिसेंबर 2022 अन्‍वये जिल्‍हा परिषदांमधील ग्रामिण पाणी पुरवठा विभागातील पदांचा सुधारीत आकृतीबंध निश्चित करण्‍यात आलेला असुन पाणी पुरवठा विभागाचे वाढलेले कामकाज विचारात घेता प्रत्‍येक तालुक्‍यासाठी 1 स्‍वतंत्र उपविभाग मंजुर करण्‍यास मान्‍यता मळिालेली आहे.त्‍याअनुषंगाने आता 16 तालुक्‍यात ग्रामिण पाणी पुरवठा उपविभागाची नीर्मीती करण्‍यात आलेली आहे..
    जिल्‍हा परिषद,यवतमाळ अंतर्गत ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे 16 उपविभाग व 1 यांत्रीकी उपविभाग असे एकुण 17 उपविभाग आहे. या विभागाअंतर्गत ग्रामिण स्तरावर शुध्द पिण्याचे पाण्या करिता नळ योजना घेवुन कार्यान्वित करुन संबधित ग्रामपंचायत ला हस्‍तांतरीत करणे,अनुषांगीक कामास तांत्रिक मान्यता प्रदान करणे.टंचाई अंतर्गत आराखडा तयार करुन पिण्याचे पाण्याचे टंचाई दुर करण्याकरिता विधन विहीर,विहीर अधिग्रहन, तात्पुरती नळ योजना घेणे
    सदर कामाकरीता वेगवेगळया शाखा असुन तांत्रीक शाखेकडुन पाणी पुरवठा योजनांच्‍या प्राकलनास तांत्रीक व प्रशासकीय मंजुरात देण्‍याचे कामकाज होते.विभागामार्फत राबविण्‍यात येणा-या योजनांची कामे उपविभागातील शाखा अभियंता व कनिष्‍ठ अभियंता यांचेकडुन पाहीली जातात. या व्यतीरीक्त या विभागाच्या अधि¬¬नस्त यांत्रीकी उपविभाग अंतर्भुत करण्यात आलेला आहे. या उपविभागाकडु¬¬न नवीन हातपंप, विद्युतपंप दुहेरी पंप सौर पंप ई. कामे केली जातात. तसेच भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे सहाय्यक भुवैज्ञानीक व कनिष्ठ भुवैज्ञानीक यांची पाणी पुरवठा योजने करिता व विंधन विहीरीकरिता स्थळ निरीक्षण करुन उद्‌भव प्रमाणपत्र देण्या करिता जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागा कडे प्रतिनियुक्तीने नेमणुक केलेली आहे.
    आस्‍थापना शाखेकडुन पाणी पूरवठा विभाग / उपविभागातील वर्ग-२ / वर्ग-३ अधिकाऱ्याचे आस्थापना विषयक कामे कर्मचा-याचे पगारा संबंधात कामे,उपविभागात कार्यरत असलेल्‍या कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी,रजा प्रकरणे, वार्षीक वेतनवाढ,वेतन देयके ,प्रवास भतता देयके वेतन निश्चिीती ,सेवा निवृत्‍ती प्रकरणे,बदल्‍या ,नियुक्‍तया,इत्‍यादी कामे केली जातात.
    लेखा शाखेमध्‍ये कंत्राटदारांची कामाची देयके पारित करणे,नोंदवहया हिशोब ठेवणे,तसेच भांडार शाखेमध्‍ये सहीत्‍य खरेदी, साठापंजी नोंदवहया ठेवणे. इत्‍यादी कामे केली जातात.

    या विभागाअंतर्गत एकुण 17 उपविभाग असुन त्‍याची संरंचना खालील प्रमाणे आहे.

    ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची संरचना
    अ.क्र. ग्रामिण पाणी पुरवठा उपविभागाचे नाव. उपविभाग प्रमुख पदनाम. अधिनस्‍त अधिकारी/कर्मचारी वर्ग पदनाम.
    1 उपविभाग यांत्रीकी. उपअभियंता(यांत्रीकी) शा.अ./क.अ./व.स./क.स.
    2 उपविभाग यवतमाळ उपअभियंता शा.अ./क.अ./व.स./क.स.
    3 उपविभाग बाभुळगांव उपअभियंता शा.अ./क.अ./व.स./क.स.
    4 उपविभाग कळंब उपअभियंता शा.अ./क.अ./व.स./क.स.
    5 उपविभाग राळेगांव उपअभियंता शा.अ./क.अ./व.स./क.स.
    6 उपविभाग आर्णी उपअभियंता शा.अ./क.अ./व.स./क.स.
    7 उपविभाग घाटंजी उपअभियंता शा.अ./क.अ./व.स./क.स.
    8 उपविभाग पांढरकवडा उपअभियंता शा.अ./क.अ./व.स./क.स.
    9 उपविभाग वणी उपअभियंता शा.अ./क.अ./व.स./क.स.
    10 उपविभाग मारेगांव उपअभियंता शा.अ./क.अ./व.स./क.स.
    11 उपविभाग झरी उपअभियंता शा.अ./क.अ./व.स./क.स.
    12 उपविभाग दारव्‍हा उपअभियंता शा.अ./क.अ./व.स./क.स.
    13 उपविभाग नेर उपअभियंता शा.अ./क.अ./व.स./क.स.
    14 उपविभाग दिग्रस उपअभियंता शा.अ./क.अ./व.स./क.स.
    15 उपविभाग पुसद उपअभियंता शा.अ./क.अ./व.स./क.स.
    16 उपविभाग महागांव उपअभियंता शा.अ./क.अ./व.स./क.स.
    17 उपविभाग उमरखेड उपअभियंता शा.अ./क.अ./व.स./क.स.

    कार्यालयाच्‍या रचनेचा तपशिल

    • कार्यकारी अभियंता
    • उपकार्यकारी अभियंता
      • तांत्रीक शाखा
      • सहाय्यक अभियंता श्रेणी 2
      • शाखा अभियंता
      • कनिष्‍ठ अभियंता
      • परिचर
      • आस्‍थापना शाखा
      • सहाय्यक प्रशासन अधिकारी
      • वरिष्‍ठ सहाय्यक
      • कनिष्‍ठ सहाय्यक
      • परिचर
      • लेखा शाखा
      • सहाय्यक लेखा अधिकारी
      • वरिष्‍ठ सहाय्यक लेखा
      • कनिष्‍ठ सहाय्यक भांडार
      • परिचर