बंद

    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा.

    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,जिल्हा परिषद, यवतमाळ.

    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत घरकुलांच्या विविध योजना राबविल्या जातात उदा. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण,रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आवास योजना व आदिम आवास योजना. सदर योजने अंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाकरिता शासनाकडून एक लाख वीस हजार रुपये अनुदान दिले जाते. व शौचालय करिता रु. 12 हजार अनुदान दिल्या जाते व एम.आर. ई.जि.एस. विभागा मार्फत किमान 23 हजार रुपये अनुदान दिले जाते असे एकूण अंदाजे 1 लक्ष 55 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाते.लाभार्थींना सदर अनुदार थेट वैयक्तिक बँक खाते मध्ये डीबीटी द्वारे दिले जाते.