बंद

    सामान्य प्रशासन विभाग.

    सामान्य प्रशासन विभाग

    विभागाचे नाव – सामान्य प्रशासन विभाग
    खाते प्रमुखाचे पदनाम – उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्‍य)
    विभागाचा दुरध्वनी क्रमांक – 07232-244471
    विभागाचा ई-मेल – dyceog_gad@yahoo.in

    सामान्य प्रशासन विभाग

    महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या 1961 नुसार दिनांक 1 मे 1962 पासुन अस्तित्वात आल्या आहे. त्या अगोदर जनपदसभा अस्तित्वात होत्या. जिल्हा परिषदेतंर्गत सामान्य प्रशासन हा विभाग अत्यंत महत्वाचा असुन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्‍य) हे जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभा व स्‍थायी समिती सभेचे सचिव म्हणुन काम पाहतात. प्रशासकीय दृष्टीकोनातुन विभागामार्फत विविध कर्मचा-यांच्या आस्‍थापना विषयक बाबी संदर्भांत कार्यवाही केल्या जाते. तसेच विविध विभागांतील कर्मचा-यांच्या बदल्या, पदोन्नत्या व नेमणुकाबाबत या विभागाकडून नियंत्रण ठेवून मार्गदर्शन केले जाते. तद्वतच वाहन, भ.नि.नि., लेखा परीक्षण, निवृत्ती वेतन, खाते चौकशी, गोपनीय अहवाल, अंदाजपत्रक व निरिक्षणाबाबतची कामे पार पाडली जातात. तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) व सर्व गट विकास अधिकारी यांचे वेतन व भत्ते व सेवा विषयक कामे करण्‍यात येतात. तसेच जिल्‍हा परिषदेची रचना व कार्यपध्दतीची या विभागामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे वतीने सर्व विभागांची कामे पार पाडली जातात. तसेच सामान्य प्रशासन विभागातील परिषद शाखेकडून जि.प. सर्वसाधारण सभा व स्थायी समिती सभा बोलावीणे व त्या सभांचे कार्यवृत्त तयार करने विविध विषय समित्यांचे गठण करणे इत्यादी बाबी पार पाडल्‍या जातात. कार्यालयीन आस्थापना पुढील प्रमाणे असुन त्‍यामध्‍ये सहा प्रशासन अधिकारी 1 पद, कनिष्‍ठ प्रशासन अधिकारी 2 पदे, वि. अ. सांख्यीकी -1 पद, व.सहा.-14 पदे, कनिष्ठ सहा-19, लघुलेखक 4, वाहनचालक-11 वाहनांचे संख्येनुसार, नाईक-1, परिचर-28 पदे मंजूर आहेत.

    जिल्हा परिषद अंतर्गत मा. पदाधिकारी व अधिकारी यांना जि. प. ने बोलविलेल्या दरमहा होणाऱ्या स्थायी समिती सभेस तद्वतच तिन महिण्यातुन बोलविलेल्या सर्वसाधारण सभेला हजर राहून सभेचे कामकाज करावे लागते. स्थायी समिती सभेकरीता स्‍थायी समिती सदस्यांना बोलविण्‍यात येते. स्‍थायी समिती व जिल्‍हा परिषद सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आलेले विषय सभागृहात चर्चील्या जावून विविध ठराव पारीत केले जातात. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विषय समिती, समाजकल्‍याण समिती, आरोग्‍य समिती, शिक्षण समिती, अर्थ समिती, बांधकाम समिती, पशूसंवर्धन समिती, महिला व बालकल्‍याण समिती व जलव्‍यवस्‍थान व स्‍वच्‍छता समिती असुन त्‍या त्‍या समित्‍यांची
    कामे संबंधीत विभाग प्रमुखाकडे सोपविली आहेत. विषय समितीची सभा महिण्यातुन एकदा बोलविली जाते.

    पंचायत समिती स्‍तरावर/तालुकापातळीवर पं. स. चे सभापती दर महिण्‍याला एक मासिक सभा घेत असतात. तालुकास्‍तरावर गटविकास अधिकारी हे पंचायत समितीचे मासिक सभेत सचिव म्‍हणून कामकाज पाहतात. सर्व गटविकास अधिकारी यांच्‍या कामकाजावर मा. मुख्‍य कार्यकारी
    अधिकारी यांचे विविध विभाग प्रमुखामार्फत नियंत्रण असते.