बंद

    शिक्षण विभाग (प्राथमिक)

    विभागासंदर्भात माहीती:-

    दिनांक 1 मे 1962 ला जिल्हा परिषद यवतमाळ स्थापना झाली असुन तेव्हापासुन शिक्षण विभाग, जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहे. आधी या जि.प.मध्ये एकच शिक्षण विभाग होता तथापि, जिल्हयाचे क्षेत्रफळ मोठे असल्याने व एकुण 16 पं.स.असल्यामुळे या जि.प.अंतर्गत शिक्षण विभाग (प्राथमिक) व शिक्षण विभाग (माध्यमिक) असे एकुण 2 विभाग करण्यात आले. या विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाचे कार्य करण्यात येते. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे या विभागाचे खाते प्रमुख असुन विभागामार्फत होणारी कामे योग्य प्रकारे व चांगल्या प्रकारे करुन घेण्यासाठी या विभागामध्ये तीन विभाग आहेत.

    1. आस्थापना विभाग
    2. लेखा विभाग
    3. पेंन्शन विभाग
    1. आस्थापना विभाग :- आस्थापाना शाखेमध्ये शिक्षकांच्या बदल्या, पदोन्नत्या, कर्मचा- यांच्या सेवाविषयक बाबी, रजा प्रकरणे, वार्षीक वेतनवाढ, वेतन देयके, प्रवास भत्ता देयके, वेतन निश्चीती, सेवा निवृत्ती प्रकरणे, बदल्या, नियुक्त्या, पदोन्नती, भविष्य निर्वाह निधी, पत्र व्यवहार इत्यादी कामे केली जातात.
    2. लेखा विभाग :- लेखा शाखेमध्ये प्राप्त निधीनुसार सर्व पंचायत समित्यांना वंटन वाटप करणे. देयके पारीत करणे, नोंदवहया, हिशेब ठेवणे, भांडार शाखेत वस्तु खरेदी करणे हिशेब ठेवणे इत्यादी कामे पाहीली जातात.
    3. पेन्शन विभाग :- पेंन्शन शाखेत 16 ही पंचायत समिती मधुन सेवा निवृत्त झालेल्या शिक्षकांचे सेवा निवृत्ती वेतन, अंशराशिकरण, उपदान, रजा रोखकीकरण, वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी मंजुर करणे तसेच इत्यादी कामे पाहीली जातात.

    विभागामार्फत राबविल्या जाणा-या योजना.

    विभागाअंतर्गत खालील प्रमाणे अधिकारी /कर्मचारी यांची रचना केलेली आहे. कार्यालयाच्या रचनेचा तपशिल

    1. शिक्षणाधिकारी (प्राथ)
    2. उप शिक्षणाधिकारी (प्राथ)
    3. लेखाधिकारी, शालेय पोषण आहार
    4. अधीक्षक (राजपत्रित)
    5. सहा.प्रशासन अधिकारी
    6. कनिष्ठ प्रशासन अधिकारी
    7. विस्तार अधिकारी (शिक्षण)
    8. कनिष्ठ लेखा अधिकारी
    9. सांख्यिकी सहायक
    10. वरिष्ठ सहायक
    11. कनिष्ठ सहायक
    12. परिचर
    विभागामार्फत राबविल्या जाणा-या योजना.
    अ.क्र. योजनेचे नाव योजनेचा उद्देश पात्रतेचे निकष
    1 मोफत गणवेश योजना गणवेश वाटप प्राथमिक शाळेत इयत्ता 1 ते 8 शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यासाठी गणवेष वाटप योजना.
    2 विशेष घटक योजना विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता.
    3 महादीप योजना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण करणे. जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 5 ते 8 पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी.
    4 माझी शाळा सुंदर शाळा शासकीय अनुदानित शाळांमध्ये भौतिक सुविधा तथा गुणवत्तेचा विकास करणे शासकीय निकषानुसार 150 गुणांचे स्पर्धात्मक गुणांकण करणे.
    5 शैक्षणिक इमारत हे शिकण्याचे साधन (बाला) शाळांमध्ये सुंदर, स्वच्छ आणि शैक्षणिक वातावरण निर्माण करणे. शासकीय पात्र शाळा.
    6 बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार 25 टक्के प्रवेशाबाबत. (RTE) टक्केवारीनुसार वंचीत घटकातील मुले/मुली यांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळण्यास अडचण जावी नाही म्हणुन बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार वंचीत घटकातील मुला/मुलींना 25 टक्के प्रवेश देण्याचा योजनेचा उद्देष आहे.
    7 सर्वशिक्षा अभियान मोफत पाठयपुस्तक योजना विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविण्याचे अनुषंगाने पालकांवरील आर्थिक ताण कमी व्हावा म्हणून पाठयपुस्तक व स्वाध्यायपुस्तीका पुरविणे. जिल्हा परिषद, नगर परिषद, खाजगी अनुदानित शाळा, आश्रम शाळा मधील इयत्त 1 ते 8 च्या सर्व विध्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तक व स्वाध्यायपुस्तीका पुरविणे.
    8 क्रिडा स्पर्धा (जिल्हा स्तरीय विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे. 16 तालुक्यातील क्रिडा स्पर्धांचे आयोजन करुन. प्राविण्य प्राप्त विद्यार्थी जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धेत सहभागी होतात.
    9 जिल्हा स्तरीय कबबुलबुल आयोजन / जिल्हा स्तरीय स्काऊट गाईड शिस्त व स्वावलांबनाचे धडे विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे. तालुकास्तरीस कबबुल स्काऊट गाईड मेळाव्यानंतर निवडक पथक जिल्हास्तरीय कबबुल स्काऊट गाईड मेळाव्यात सहभागी होतात.
    10 जिल्हा परिषद शाळांतर्गत ई-वर्गजमीन हऱ्रास करणे. शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करणे. ज्या जिल्हा परिषद शाळांतर्गत ई-वर्गजमीन आहे त्या हऱ्रास करणे.
    11 जिल्हा स्तरीय शिक्षण पुरस्कार शिक्षकांचे शैक्षणिक गुणवत्ते प्रती मनोबल वाढविणे. मागील 5 वर्षांतील .कार्यमूल्यमापणाचा अत्युत्कृष्ट दर्जा असलेला अहवाल. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अहवाल. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी शिक्षकांनी राबविलेला नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम. तसेच, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय दि.28/06/2022 नुसार आवश्यक बाबी.