बंद

    लघु पाटबंधारे विभाग.

    लघु पाटबंधारे विभाग.

    • विभागाचे नांव व पत्‍ता – लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद, आर्णि रोड,यवतमाळ
    • विषय समिती सभपती – मा. अध्‍यक्ष, जलव्‍यवस्‍थापन व स्‍वच्‍छता समिती.
    • कार्यालय प्रमुखाचे पदनाम – जिल्‍हा जलसंधारण अधिकारी
    • विभागाचे दुरध्‍वनी क्र. – 07232-245258
    • विभागाचा इ मेल आयडी – dwczpytl@gmail.com

    विभागा संदर्भात संक्षिप्‍त माहिती

    यवतमाळ जिल्हया मध्‍ये जिल्‍हा परिषद अंतर्गत लघु पाटबंधारे विभाग सन 1971 पासुन कार्यरत असुन, या विभागांतर्गत एकुण 16 तालुक्‍या मध्‍ये चार उपविभाग (यवतमाळ, दारव्हा, पुसद, वणी उपविभाग ) कार्यरत आहे. प्रति उपविभागांतर्गत एकुण चार तालुके आहेत.

    दरम्‍यान शासन निर्णय क्र. आस्‍था 2016/प्रक्र 88 (भाग-9)/जल-2 ग्रामवकिास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई दि. 31 मे 2017 च्‍या शासन निर्णयाद्वारे मृद व जलसंधारण आयुक्‍तालयाच्‍या स्‍थापनेसह विभागाच्‍या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचना करण्‍यात आली. त्‍यानुसार संपुर्ण राज्‍यासाठी छ. संभाजीनगर येथे मृद व जलसंधारण आयुक्‍तालयाची स्‍थापना करण्‍यात असुन जलसंधारण विभागाचे नाव मृद व जलसंधारण विभाग असे करण्‍यात आले व जिल्‍हा परिषद यंत्रणेकडील मंजुर पदे कार्यरत अधिकारी व कर्मचारी सह मृद व जलसंधारण विभागाकडे कायमस्‍वरुपी समायोजीत करण्‍यात आली. सदर शासन निर्णयानुसार जि. प. (ल.पा.) विभागाकरीता 19 पदांचा आकृतीबंध मंजुर करण्‍यात आाला असुन जिल्‍हा जलसंधारण अधिकारी चे एक पद, सहायक जिल्‍हा जलसंधारण अधिकारी हे एक पद, जलसंधारण अधिकारी चे चार पदे सह इतर कार्यालयीन कर्मचारी वर्ग इत्‍यादी पदे निर्मितीस मंजुरी मिळाली आहे. तसेच उपविभाग स्‍तरावर एकुण 15 पदास मंजुरी मिळाली आहे.

    जिल्‍हा परिषद अंतर्गत लघु पाटबंधारे विभागाकडे 0 ते 200 हेक्‍टर सिंचन क्षमतेच्‍या योजना येतात. त्‍या अंतर्गत जिल्‍हा वार्षिक योजनाच्‍या लेखा शिर्षातुन प्रामुख्‍याने कोल्‍हापुरी पद्धतीचे बंधारे, साठवण बंधारे लघु पाटबंधारे तलाव, पाझर तलाव, साठवण तलाव, सिमेंट नाला बांधकाम इत्‍यादी बांधकाम करणे वा त्‍याची देखभाल, दुरुस्‍ती करणे इत्‍यादी बाबी तांत्रिक शाखेकडुन कार्यान्‍वीत करण्‍यात येतात. तसेच वेळोवेळी शासनाने प्रस्‍तावित केलेल्‍या विविध योजना मधुन तलावातील गाळ काढणे, नाला खोलीकरण व गाळ काढणे इत्‍यादी कामे प्रामुख्‍याने केल्‍या जातात. तसेच तांत्रिक रेखाचित्र शाखेकडे, जिल्‍हा माहिती पुस्तिका तयार करणे, वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे, सांख्यिकी अहवाल तयार करणे, पाणीपट्टी वसुली बाबत तसेच मत्‍स्यमारी चे हर्रास बाबत अभिलेख ठेवणे इ. कामे केल्‍या जातात. तसेच आस्‍थापना शाखेकडुन विभागातील तसेच उपविभागातील कार्यरत वर्ग 1, 2 व 3 अधिका-यांचे व कर्मचा-यांचे आस्‍थापना विषयक कामे जसे की, वेतन देयक तयार करणे, कर्मचा-यांच्‍या सेवा विषयक बाबी, रजा प्रकरणे, वार्षिक वेतनवाढ, प्रवासभत्‍ता देयक, सेवानिवृत्‍ती प्रकरणे, बदल्‍या, इ. बाबी कार्यान्‍वीत केल्‍या जातात.

    लेखा शाखेमध्‍ये, तांत्रिक कामांच्‍या निविदा काढणे, कंत्राटदाराची कामांची देयके पारीत करणे, जमाखर्चाच्‍या रकमेचा ताळमेळ घेणे, विविध नोंदवह्या ठेवणे, स्‍थानिक लेखा परिच्‍छेद तसेच महालेखाकार यांचे परिच्‍छेदाचे अनुपालन करणे, इ. कामे केल्‍या जातात. तसेच भांडार शाखेमध्‍ये साहित्‍य खरेदी, साठा पंजी नोंदवह्या ठेवणे इ. कामे केली जातात.