बंद

    राजश्री शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेकरिता अर्ज सादर करणे बाबत.

    प्रकाशित तारीख: जून 19, 2025

    जेष्ठ कलावंत व साहित्यिक अर्ज करने सन २०२५-२६ बाबत प्रेस नोट.
    जेष्ठ कलावंत व साहित्यिक योजनेच्या अर्जासोबत सादर करावयाचे शपथपत्र.

    राजश्री शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेकरिता अर्ज सादर करणे बाबत.

    “राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना” अंतर्गत महाराष्ट्र शासन, शासन निर्णय क्र. वृकमा ४३२१ (१५)/प्र.क्र.१४५/सां.का. ४ पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, दिनांकः १६ मार्च, २०२४ नूसार कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असलेल्या १०० मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार यांना प्रती महीना रुपये ५०००/- मानधन देण्यात येते. या योजनेची लाभार्थी पात्रता १. ज्यांचे वय ५० पेक्षा जास्त आहे. दिव्यांगांना वयाची अट १० वर्षाने शिथिल करण्यात येत आहेत. (दिव्यांगांना वयोमर्यादा ४० वर्षे) २. ज्यांचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी १५ वर्षे आहे. ३. ज्यांनी साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातली आहे. ४. वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा/परितक्त्या/दिव्यांग कलाकर यांना प्राधान्य राहील. ५. कलाकाराचे सर्व मार्गानी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६०,०००/- पेक्षा जास्त नसावे. ६. ज्या कलाकारांची उपजिविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते, मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार. ७. केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भुत नसलेले पात्र कलाकार. ८. कलाकार/साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. अशा पात्र लाभार्थी यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर दिनांक १ जुलै २०२५ ते ३१ जुलै २०२५ पर्यतऑनलाईन अर्ज भरणेकरीता आवाहन करण्यात येत आहे. आवश्यक दस्ताऐवजः- 1. वयाचा दाखला, 2. आधारकार्ड, 3. उत्पन्नाचा दाखला, 4. रहिवासी दाखला, 5. प्रतिज्ञा पत्र, 6. पती-पत्नी एकत्रीत फोटो (लागू असल्यास), 7. बैंक पासबुक, 8. अपंगत्व दाखला (लागू असल्यास), 9. राज्य/केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र (लागू असल्यास), 10. नामांकित संस्था/व्यक्ती यांचे शिफारस पत्र (लागू असल्यास), 11. विविध पुरावे

    (पंकज भोयर )
    उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचा.)
    तथा सदस्य सचिव
    राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व
    कलावंत मानधन समिती, यवतमाळ.