बंद

    आरोग्य विभाग

    आरोग्य विभाग

    या विभागामार्फत प्रा.आ. केंद्र तथा अधिनस्त उपकेंद्राव्दारेᅠग्रामिण जनतेस आरोग्य सुविधा पुरविणे. आरोग्य विषयक शासनाच्या विविध योजना उपलब्ध कर्मचा-याव्दारेᅠकार्यान्वीत करुन त्याचा लाभ ग्रामिण जनतेला व लाभार्थ्यांना देणे. उदा जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा योजना, मातृत्व अनुदान योजना, निक्षय योजना, दुर्धर आजार अर्थसहाय्य योजना ईत्यादी./p>

    सहा राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी करुन उद्दीष्ठे पुर्ण करुन घेण्याचा प्रयत्न करने. बांधकाम विभाग तथा पायाभुत सुविधा कक्षामार्फत प्रा.आ.केंद्र व उपकेंद्र बांधकाम व दुरुस्तीची कामे करुन घेणे. योजनेअंर्गत कुटूंब कल्याणचे उद्‌दीष्ठ पूर्ण करुन घेणे.आरोग्य विभागातील प्रा.आ.केद्रातील, उपकेन्द्रातील वर्ग-1, वर्ग-२,वर्ग-३,तथा वर्ग-४, कर्मचा-याच आस्थापना विषयक कामे विविध योजना, कर्मचा-याचे वेतन व भत्ते तथा बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करुन अनुदान प्राप्त करुन घेणे व त्या अनुषंगाने प्राप्त अनुदान, झालेला खर्च यावर नियंत्रण ठेवणे जि.प कर्मचा-यानी विशिष्ठ आजाराकरिता घेतलेल्या खाजगी उपचाराची तपासणी करुन वैद्यकिय प्रतिपु्‌र्ती करिता
    आजार प्रमाणित करुन घेणे.

    ग्रामिण जनतेला आरोग्य विषयक सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे .तसेच आरोग्य विषयक विविध योजनेचा लाभ ग्रामिण जनतेपंर्यत पोहचविणे. आरोग्य विभागा अंतर्गत कार्यरत तालुका आरोग्य अधिकारी वै्‌द्यकिय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहायक, प्रसाविका, (एल.एच.व्ही), आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषधी निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रशासकिय अधिकारी, कक्ष अधिकारी, अधिक्षक ,वरिष्ठ सहायक, सहायक लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहायक, सांख्यीकी अन्वेक्षक, ईत्यादी.